गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

  • शहरातील घाट व मिरवणूक मार्गांवर स्वच्छता 

पिंपरी : गणेश विसर्जनानंतर मिरवणूक मार्ग व घाटांची साफसफाई आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी करावी लागत होती. काही टन निर्माल्य गोळा होत होते. यंदा मात्र निर्माल्यात मोठी घट झाली असून, रस्त्यांवरही फारसा कचरा आढळला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व पर्यावरण संवर्धनासाठी शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार गणेश मंडळांसह नागरिकांनीही उत्सव साजरा केला. बहुतांश मोठ्या मंडळांनी या वर्षी प्रतिष्ठापनाच केली नाही. अनेक भाविकांनी घरगुती मूर्ती शाडूच्या घेतल्या होत्या. मात्र, त्यांचे प्रमाण कमी असल्याने व पीओपीच्या मूर्तींना परवानगी असल्याने अनेकांनी पीओपीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या विसर्जनासाठी महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांनी फिरते हौद व संकलन वाहन ठेवले होते. या सर्व मूर्तींची विधिवत पूजा करून वाकड येथे खोल पाण्यात विसर्जित केल्या. मात्र, दरवर्षीच्या मिरवणुका, गुलाल व भंडाऱ्याची उधळण आणि दर्शनासाठी येणारे भाविक यामुळे विसर्जन मार्ग व घाटांवर कचरा, निर्माल्य मोठ्या प्रमाणात दिसत होते. या वर्षी त्यात मोठी घट झाली. तरीही सफाई कर्मचाऱ्यांनी सर्व घाटांवर बुधवारी (ता. 2) स्वच्छता मोहीम राबवली. 

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मूर्ती संकलन 

  • गेल्या वर्षी : 52 हजार 577 
  • या वर्षी : 31 हजार 574 
  • घट : 21 हजार 3 

निर्माल्य संकलन 

  • गेल्या वर्षी : 33 टन 
  • या वर्षी : 7 टन 
  • घट : 26 टन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh idols, nirmalya decline after ganesh immersion at pimpri chinchwad