Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Pimpri Chinchwad Ganeshotsav news: चिंचवडगावातील गणेश मंडळांची जोरदार तयारी; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून धार्मिक उत्सवाबरोबर सामाजिक प्रबोधनाचा संगम
Pimpri Chinchwad Ganeshotsav news

Pimpri Chinchwad Ganeshotsav news

sakal

Updated on

चिंचवड, : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने चिंचवडगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना मिरवणूक, मंडप व सजावटीच्या कामांची कार्यकर्त्यांकडून लगबग सुरू झाली आहे. प्रमुख रस्ते, चौक आणि मोकळ्या जागांमध्ये मंडप उभारले जात आहेत.

चिंचवडगाव परिसरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतानाच यंदाचा गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि देखण्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. मंडप उभारणीसाठी आवश्यक बांबू, लोखंडी सांगाडे, कापड, ताडपत्री तसेच सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

दरवर्षी चिंचवडगाव परिसरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जिवंत देखाव्यांवर विशेष भर देत असतात. धार्मिक, ऐतिहासिक तसेच समाजाला संदेश देणाऱ्या सत्य घटनांवर आधारित देखावे साकारण्याचे नियोजन करण्यात येत असते. त्यासाठी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देखाव्यासाठी लागणारे साहित्य, रंगमंच, प्रकाशयोजना आणि कलाकारांची तयारी केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना केवळ धार्मिक उत्सवाचा आनंदच नव्हे, तर विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेशही मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com