esakal | उर्से टोल नाक्यावर घातला होता धिंगाना; गजानन मारणेच्या 17 साथीदारांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime News, Pimpari Chinchwad

17 जणांना अटक करण्यात आली असून गजा मारणेसह इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.  Gangster Gajanan Marne 17 supporters arrested talegaon dabhade Pimpari Chinchwad 

उर्से टोल नाक्यावर घातला होता धिंगाना; गजानन मारणेच्या 17 साथीदारांना अटक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पिंपरी :  खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी नवी मुंबईतील तळोजा कारागृहापासून मोठी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फटाके वाजवून, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तळेगाव दाभाडे पोलिसांनी गजा मारणेच्या 17 साथीदारांना अटक केली आहे. तर गजा मारणेसह इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. 

सागर सुखदेव थिटमे (वय 25, रा. धायरी), संतोष चंद्रकांत शेलार (वय 36, रा. कोंढवे धावडे), रघुनाथ चंद्रकात किरवे (वय 49,रा. भोर), सागर वसंत शेडे (वय 29, कोंढवे धावडे), मावली रामदास सोनार (वय 20, रा. कोंढवे धावडे), आशिष वसंता अवघडे (वय 26 रा. उत्तमनगर, पुणे), अनिल राजाराम मदने (वय 42, रा. औंध), मयूर अर्जन गाडे (वय 21), वेंकटेश व्यंकटया स्वर्पराज (वय 36, राहणार धानोरी),  शुभम मनोहर धुमने, (राहणार धानोरी) , शैलेश रवींद्र गावडे (वय 25 राहणार चिंचवड),  अखिल जयवंत उबाळे (राहणार विश्रांतवाडी),  अभिजीत विजय घारे (राहणार बेबडओहळ), अनिल संपत जाधव (राहणार पुरंदर),  निलेश रामचंद्र जगताप (राहणार पुरंदर), रोहन अर्जुन साठे (राहणार येरवडा),  योगेश राम कावली (राहणार चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला

दोन खून केल्याच्या प्रकरणातून मारणे याची निर्दोष मुक्तता झाल्याने  सोमवारी 15 फेब्रुवारी सायंकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर कारागृहाबाहेर गर्दी केलेल्या त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून घरापर्यंत मारणे याची मिरवणूक काढली. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तिथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर कलम 188, 143, 283, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) सह 135 फौजदारी कायदा कलम 7 प्रमाणे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून  गजानन मारणे, रुपेश कृष्णराव मारणे,  सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार,  अनंता ज्ञानोबा कदम,  प्रदीप दत्तात्रय कंदारे,  बापू श्रीमंत बाबर,  गणेश नामदेव हुंडारे,  सुनील नामदेव बनसोड  यांच्यासह इतर आरोपी फरारी आहेत. या गुन्ह्यात एक ड्रोन कॅमेरासह अकरा विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्या 12 मोबाईल जप्त केले आहेत. तसेच दीडशे ते दोनशे वाहनांसह फरारी आरोपींना अटक करण्यासाठी नऊ पथके तयार करण्यात आली आहेत.