esakal | 'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!
sakal

बोलून बातमी शोधा

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!
  • कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगवर भर
  • आमंत्रण देता येणार नसल्याने निरुत्साह 

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात दरवर्षी लाडक्‍या गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साजरा होणार आहे. दरवर्षी कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मैत्रिणी नटून-थटून मोठ्या थाटामाटात लाडक्‍या गौरीचे आगमन करतात. मात्र, यावेळी गौरी सणाचा उत्साह ओसरला आहे. महिलांनी घरातच फराळ बनवून गौराईची आरास मनोभावे केली आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे आमंत्रण न देता एकापाठोपाठ येणाऱ्या सर्व सणांसह ज्येष्ठा गौरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांना मुरड घालावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गौरीचे मंगळवारी (ता.25) आगमन होत आहे. घरोघरी सजावट व विविध आरास, रोषणाई सुरू आहे. आठ दिवसांपासून फराळाचा आस्वाद घरोघरी दरवळत आहे. सोळा प्रकारचे पंचपक्वान, सोळा भाज्या व विविध फळांच्या कोशिंबीरीचा नैवेद्य गौराईला असतो. यासह पुरणपोळीचा बेतही कुटुंबीयापुरताच मर्यादित राहणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे बाजारातही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांना धाकधूक वाटत आहे. गौरीच्या साड्या खरेदी करण्यापासून ते मुखवटे, दागदागिने व विविध देखाव्यासाठी लागणारे सिाहत्य व डेकोरेशनसाठी महिलांची बाजारात लगबग दिसून येते. मात्र, घरी कोणालाही बोलावता येणार नसल्याने बऱ्याच सखींनी साध्या पद्धतीने गौरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गौरीच्या आगमनादिवशी देखील पाच सुवासिनीना बोलावून गौरी बसविल्या जातात. या वर्षी मात्र, कुटुंबापुरताच हा सण मर्यादित राहणार असल्याने व्हॉट्‌सऍप ग्रुपवर केवळ सजावटीचे फोटो शेअर केले जाणार आहेत. अन्यथा दरवर्षी महिलांची व्हॉटसऍप ग्रुप व कॉल करून मैत्रिणी व नातेवाइकांना आमंत्रण देण्याची गडबड असते. सोसायटीतील सर्वांना आवर्जून आमंत्रित केले जाते. हळदी कुंकुवासाठी महिला सायंकाळीच आवरून नटून-थटून घराबाहेर पडतात. गप्पा गोष्टी व चहापान रंगते. बुधवारी (ता. 26) ला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. मात्र, महिला घराबाहेर पडणार नसल्याचे चित्र आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

दरवर्षी मैत्रिणी व कुटुंबीयांना आमंत्रण असते. मात्र, यावेळी धाकधूक वाटत आहे. घरातच आम्ही पिंपळे सौदागरला पारंपरिक पद्धतीने गौरी बसवून सजावट करणार आहे. घरी बोलावणे अशक्‍य आहे. सोशल डिस्टन्सिंग व गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरातच विधिवत गौरीचे आगमन करून विसर्जन करणार आहे.
- उज्ज्वला कुलकर्णी, चिंचवड 
 

loading image