
पवनानगर : इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात पवनानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील मुलींनी सर्वोत्तम गुण मिळवले. यात पवना सायन्स कॉलेज आणि दळवी कॉलेजच्या वाणिज्य विभागाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. पवनानगर येथील लायन्स शांता माणेक पवना आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.