पिंपरी : स्मार्ट सिटीत गृहखरेदीची सुवर्णसंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये १६ व १७ एप्रिल रोजी ‘सकाळ वास्तू प्रदर्शन २०२२
पिंपरी : स्मार्ट सिटीत गृहखरेदीची सुवर्णसंधी

पिंपरी : स्मार्ट सिटीत गृहखरेदीची सुवर्णसंधी

पिंपरी : ‘सकाळ’ माध्यम समूहामार्फत आयोजित ‘सकाळ वास्तू प्रदर्शन २०२२’ हे १६ व १७ एप्रिलला चिंचवड-ऑटो क्‍लस्टर येथे भरविले जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असणार आहे. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

सध्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम वातावरण असून सर्वत्र उत्साह आहे. भविष्यात बांधकाम साहित्य व मुंद्राक शुल्क व गृहकर्जामध्ये वाढ होण्याची शक्यता असून घरांची किमती वाढत राहणार आहेत. सध्या ग्राहकांना परवडेल अशा दरांमध्ये घर उपलब्ध असून अधिकाधिक ग्राहकांनी ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’ला भेट द्यावी. एकाच ठिकाणी विविध गृहप्रकल्पांची माहिती प्रत्यक्ष बांधकाम व्यावसायिकांद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे या प्रदर्शनात थेट मिळतील. ‘फरांदे स्पेसेस’ने सुद्धा सर्वसामान्य ग्राहकाचा विचार करीत नवीन गृहप्रकल्प देण्याचा प्रयत्न केला आहे.

- आकाश फरांदे, फरांदे स्पेसेस

‘तनिष पार्क’ हा पिंपरी-चिंचवडमधील सर्वात कमी दर असलेला व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला गृहप्रकल्प आहे. ‘सकाळ वास्तू प्रदर्शन’ हे ग्राहकांसाठी पर्वणी असते. वन बीएचके व टू बीएचके फ्लॅटची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. ग्राहकांना परवडणारे व अल्प दरातील प्लॅट ‘तनिष पार्क’ येथे उपलब्ध असून, ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या घराचे स्वप्न साकार करावे. उत्तम दर्जेदार बांधकाम व सोयीसुविधा यामुळे ‘तनिष्क पार्क’ हा गृहप्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

- राजेश मेहता, तनिष पार्क

प्रशस्त रस्ते, वीज, पाणी या सुविधांमुळे घर घेवू इच्छिणाऱ्यांचा कल शहराकडे वाढत आहे. ‘प्रदर्शना’च्या माध्यमातून एकाच छताखाली शहरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन घेता येणार आहे. विविध ॲमेनिटीज, लॅविश फ्लॅट, ‘शालिग्राम स्काय’ व ‘शालिग्राम पॅविलिया’ या गृहप्रकल्पात ग्राहकांना मिळणार असून अधिकाधिक ग्राहकांनी या गृहप्रकल्पाला भेट द्यावी.

- योगेश चिंचवडे, शालिग्राम ग्रुप

Web Title: Golden Opportunity To Buy A Home In A Smart City Sakal Vastu Pradarshan 2022 Pimpri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top