

पिंपरी : अवघा एक वर्ष नऊ महिन्यांचा चिमुकला, पण देशांची नावे पटापट सांगतो. चवी ओळखतो, विविध भाज्या, पक्षी, गाड्यांची नावे, बाराखडी, एबीसीडी त्याचे तोंडपाठ आहे. एवंढचं काय, रामायणातील पात्रेही तो म्हणून दाखवतो. त्याच्या या हुशारीमुळे कुटुंबीयही हरखून गेले आहेत. अगदी अल्पावधीत त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१’मध्ये झाली असून, त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
रहाटणीतील नखाते वस्ती, निसर्ग सोसायटीमध्ये बिंगेवार कुटुंब राहते. या कुटुंबात शार्विलचा जन्म एक ऑक्टोबर २०१९ रोजी झाला. लहानपणापासूनच शार्विल तल्लख बुद्धीचा असल्याने चटकन कोणतीही गोष्ट तो लक्षात ठेवतो. घरातील पुस्तके व टीव्ही पाहून प्रत्येक पात्रांची नावे तो लक्षात ठेवत होता. तेव्हापासून त्याची रुची घरच्यांना समजली. पालकांनाही या गोष्टीचा हुरुप वाटला आणि हळूहळू त्यांनी ऑनलाइन अभ्यास करून अधिकाधिक प्रमाणात शार्विल कसा पारंगत होऊ शकतो याकडे लक्ष वेधले. शार्विलची आई पद्मावती यांनी त्याचा सराव करून घेतला. स्पर्धेची माहिती घेतली आणि त्यासाठी नोंदणी केली.
चार ऑगस्ट रोजी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची निवड झाल्याचे घोषित झाले. १३ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्रासाठी नामांकन मिळाले. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’च्या २०२२मधील पुस्तकात शार्विलच्या उपक्रमाची नोंद होईल. यापुढे शार्विलला वाहतूक चिन्हे शिकविण्याचा आईचा प्रयत्न आहे. नागरिकांनाही काही बाबी समजत नाहीत. परंतु, सर्वसामान्यांच्या बुद्धीपेक्षाही तो अधिक वेगाने सर्व गोष्टी आत्मसात करतो, पुढील स्पर्धेसाठी त्याला उतरविण्याचा कुटुंबीयांचा मानस आहे.
दीड वर्षांचा असल्यापासून हळूहळू त्याला प्रत्येक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कुटुंबीयांची सर्वांची मेहनत आहे. त्याचा उत्साह पाहून खरंच आम्ही हे करू शकलो. तो खेळत असतानाही या सर्व गोष्टी सहजपणे आत्मसात करतो. कोरोनामुळे ऑनलाइन स्पर्धेसाठी नोंदणी केली व सर्व माहितीदेखील ऑनलाइन पाठवली. शुक्रवारी आम्हाला त्यांचे पत्र मिळाले. सर्वांना आनंद झाला. - विजय बिंगेवार, शार्विलचे वडील, रहाटणी
शार्विल काय काय सांगतो?
२१ फळे, ९० प्रसिद्ध व्यक्ती, ३३ प्राणी, १२ पक्षी, १९ गाड्या, हिंदी वर्णमाला, १२ विविध आकार, २७ राज्य व देशांची राजधानी, एक ते १० तेलगू अंक, एक ते २५ मराठी अंक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.