Video : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगरसाठी आता ही विशेष मोहिम...

Video : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगरसाठी आता ही विशेष मोहिम...
Updated on

पिंपरी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगरमधील नागरिकांना धान्याच्या किटचे वाटप करण्यासाठी दोन दिवसांपासून विशेष मोहिम राबवण्यात आली. महापालिकेने साधू वासवानी मिशनच्या मदतीने हा उपक्रम राबवल्याचे अ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले. 

चिंचवडमधील आनंदननगर परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. आतापर्यंत दोन वेळा या भागातील नागरिक रस्त्यावर आल्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे या परिसरात राहाणाऱ्या अडीच हजार कुटुंबाना घरात अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात आले. या परिसरातील प्रत्येक घरामध्ये धान्याचे किट देण्यासाठी प्रशासनाकडून टोकन क्रमांकाचे वाटप करण्यात आले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत या नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले. या भागातील नागरिकांना 15 दिवस पुरेल इतके धान्य त्या किटमध्ये आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. आनंदननगर भागातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्‍यकता असल्याचे इंदलकर यांनी नमूद केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com