पिंपरी : 'या' सोसायट्यांमध्ये होतेय नियमांची...

पिंपरी : 'या' सोसायट्यांमध्ये होतेय नियमांची...
Updated on

पिंपरी : सोसायटीच्या आवारातच किराणा, दूध, भाज्या, फळे, एटीएमद्वारे पैसेही मिळताहेत, मग उन्हातान्हात कशाला फिरा, अशी भावना सभासदांमध्ये रुजत आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी होऊन पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही 25 टक्‍के घटला आहे. 

अनेक नागरिक किरकोळ कारणांसाठी वरचेवर रस्त्यावर फिरत असतात. त्यांना रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. कोणीही संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करीत नाही ना याची तपासणी पोलिस करीत असतात. मात्र, सततच्या बंदोबस्तामुळे पोलिस कर्मचारी त्रस्त झाल्याचे दिसते. काही पोलिस कवितांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील वेदना सोशल मीडियाद्वारे व्यक्त करीत आहेत. त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देता येईनासा झाला आहे. रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणच कमी झाले तर साहजिकच पोलिसांवरील कामाचा ताणही कमी होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोसायटी फेडरेशनचा पुढाकार 
पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने वाकड, पिंपळे निलख परिसरातील सुमारे 350 ते 400 सोसायट्यांमध्ये सरकारच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोसायटीमधील सभासदांना बाहेर येताना-जाताना कोणत्या कामासाठी जाणार आहे, त्याची नोंद करावी लागते. त्यासाठी वेळही निश्‍चित करण्यात आली आहे. त्याच वेळेत सभासदांना ये-जा करावी लागते. सोसायट्यांनी काही औषध विक्रेत्यांशी टाय-अप केले आहे. त्यामुळे सभासदांना त्याच दुकानांमधून औषध घ्यावे लागते. 

औषधाच्या कारणासाठी बाहेर गेलेला व्यक्ती त्याच कारणासाठी गेला आहे किंवा कसे याची सोसायटीचे अध्यक्ष, सरचिटणीस संबंधित दुकानदाराला फोन करून खातरजमा करतात. तसेच सभासदांना ये-जा करताना सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या सुरवातीच्या टप्प्यात सोसायट्यांमधील जे सभासद परगावाहून परत आले, त्यांना 28 दिवस क्वारंटाइन करण्यात आले. त्याचाही सकारात्मक परिणाम झाला. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले, "सोसायट्यांमध्ये सरकारी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने सोसायट्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यामुळे झाला पोलिसांवर ताण कमी 

- मेन गेटलाच कुलूप 

- केवळ अत्यावश्‍यक वैद्यकीय कारणांसाठी कुलूप उघडण्यात येते 

- पोलिसांकडून ऑटो रिक्षांद्वारे लॉकडाऊनविषयी जनजागृती 

- काहीजणांवर गुन्हे तर काहींना कडक शब्दात समज 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"सोसायट्यांमधील रहिवाशांना वेबिनारच्या माध्यमातून सरकारी नियमांची माहिती दिली. तसेच त्यांच्या शंकांना उत्तरे दिली. त्याचप्रमाणे बॅंकांची एटिएमद्वारे घरपोच पैसे मिळण्यासाठी संबंधित बॅंकांशी टाय-अप करून दिले. विविध मॉलशीही टाय-अप करून दिले. या सर्व बाबींमुळे रस्त्यावरील अनावश्‍यक गर्दी 25 टक्के तरी निश्‍चितच कमी झाली आहे." 

- विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक, वाकड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com