
पिंपरी : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवडकरांनी यंदाही वाहन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात सात दिवसांत नव्याने सहा हजार वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ९७६ दुचाकींची संख्या आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा यंदा वाढल्याचे दिसून आले.