
दारू पाजून बेदम मारहाण करीत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली.
पिंपरी : दारू पाजून बेदम मारहाण करीत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीरनगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
फिर्यादी या एका एअरलाईन्स कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत आहेत. तसेच, आरोपीचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी व फिर्यादी यांची टिंडर ऍपवरून ओळख झाली होती. शनिवारी (ता. 26) दुपारी आरोपीने फिर्यादीला हिंजवडीतील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर फिर्यादीला घरी नेऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, फिर्यादीने त्यास विरोध केला. त्यावेळी आरोपीने लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला, डोळ्याला, तोंडाला दुखापत झाली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, आरोपीने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी लैंगिक अत्याचार, मारहाण, अपहरण आदी गुन्हे वाकड पोलिसांनी दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.