Wakad News : ‘आता मुलाला काय खाऊ घालू, कसं जगू...’; वाकड परिसरातील मुंजोबानगरमधील माउलीच्या वेदना

शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत या माउलीचा आणि तिच्या एकुलत्या एक मुलाचा जीव वाचला, पण पै-पैका, भांडी-कुंडी, कपडा-लत्ता असं सारं काही आगीत खाक झालं.
Suman Rathod

Suman Rathod

sakal

Updated on

वाकड - ‘आता मुलाला काय खाऊ घालू, कसं जगू...’ घराची अन् स्वप्नांचीही राखरांगोळी झालेल्या घरासमोर उभ्या राहून डोळ्यांतून ओघळणारे अश्रू कसेबसे रोखत सुमन राठोड भावनांना वाट मोकळी करून देत होत्या.

वाकड परिसरातील मुंजोबा नगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत या माउलीचा आणि तिच्या एकुलत्या एक मुलाचा जीव वाचला, पण पै-पैका, भांडी-कुंडी, कपडा-लत्ता असं सारं काही आगीत खाक झालं. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पतीने साथ सोडल्याने ही माय-लेकरं दोघचं राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com