
मच्छिंद्र कदम
चिंचवड : नेहमी चाऱ्याच्या शोधात कित्येक मैल भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना यंदाच्या पावसामुळ प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, मेंढ्यांना चारण्यासाठीही त्यांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. सततच्या पावसाने राहण्याची झोपडीदेखील ओलसर व पाण्याखाली येत आहे. रात्रीच्या वेळेस अक्षरक्षः जागरण करून रात्र काढावी लागत आहे.