- बेलाजी पात्रे
हिंजवडी - पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे आयटी नगरी हिंजवडीची मोठी वाताहत झाली होती. मात्र यातून प्रशासनाने काहीच बोध न घेतल्याने शनिवारी (ता. ७) सकाळी केवळ पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे आयटीतील रस्त्यावर चक्क जलप्रलय आल्याचा प्रत्यय सर्वांना आला. कंबरेपर्यंतच्या पाण्यामुळे काही दुचाकी देखील वाहून गेल्या तर तब्बल पाच तास कोंडीचा मन:स्ताप सर्वांना सहन करावा लागला.