esakal | पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसामुळे उडाली धांदल 

बोलून बातमी शोधा

heavy Rain in  Pimpri Chinchwad

मागील दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. सोमवारीही दुपारी कडाक्याचे ऊन होते. दरम्यान, सायंकाळी सडेचार नंतर वातावरण अचानक बदलले . सोसाट्याच्या वाऱ्यासह ढग दाटून येऊ लागले. पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसामुळे उडाली धांदल 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ढगांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक बरसलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांची गैरसोय झाली.  मागील दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. सोमवारीही दुपारी कडाक्याचे ऊन होते. दरम्यान, सायंकाळी सडेचार नंतर वातावरण अचानक बदलले . सोसाट्याच्या वाऱ्यासह ढग दाटून येऊ लागले. पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या या  पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. विकेंड लोकडाऊन नंतर खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांची धावपळ झाली . खरेदी केलेला माल घरी नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.   

सायंकाळच्या वेळी कामावरून सुटून घरी निघालेल्या चाकरमान्यांचेही हाल झाले. सोबत रेनकोट, छत्री नसल्याने पुलाखाली अथवा झाडाखाली अडोसा घेतला. तर काहींनी पावसात भिजत जाण्यास प्राधान्य दिले. रस्त्यावरील धूळ त्यातच पाऊस पडल्याने काही ठिकाणचे रस्ते निसरडे झाले होते. यामुळे काही ठिकाणी वाहन घसरण्याच्या घटना घडल्या.  

रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ 
शहरात कोरोना  प्रादुर्भाव वाढत असल्याने गंभीर स्थिती आहे. विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीयेत तर काहींना रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. अशातच सोमवारी अचानक बरसलेल्या पावसामुळे  रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणीत आणखीच भर पडली.