hinjewadi maan road rain water storage
sakal
हिंजवडी - विजेच्या कडकडाटासह पावसाने सोमवारी (ता. २१) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हजेरी लावली. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह वाकड, थेरगाव, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील प्रमुख रस्ते जलमय झाले. वाहनचालकांची विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. पावसाचे पाणी, सांडपाणी आणि रस्त्यावरील कचरा एकत्र आल्याने अनेक भागांत नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागला.