Video : लॉकडाऊनमध्येही वनौषधी उद्यानाची जपणूक; निमाचे डॉक्‍टर करताहेत संगोपन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

औद्योगिक प्रदूषण कमी करणे आणि औषधी लागवडीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)ला 2008 मध्ये 21 वर्षांच्या कराराने भोसरी एमआयडीसीमधील एस ब्लॉकमधील सुमारे 42 गुंठे जागा देण्यात आली आहे. याच जागेवर "निमा'ने वनौषधी उद्यान विकसित केले आहे.

पिंपरी - भोसरी एमआयडीसीमधील सुमारे 42 गुंठे एकरावर विकसित केलेल्या वनौषधी उद्यानाची लॉकडाऊनमध्येही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)च्या डॉक्‍टरांकडून काळजी घेतली जात आहे. तसेच संघटनेचे सदस्य डॉक्‍टर उद्यानाच्या देखभालीसाठी वेळोवेळी गरजेनुसार श्रमदानही करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औद्योगिक प्रदूषण कमी करणे आणि औषधी लागवडीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)ला 2008 मध्ये 21 वर्षांच्या कराराने भोसरी एमआयडीसीमधील एस ब्लॉकमधील सुमारे 42 गुंठे जागा देण्यात आली आहे. याच जागेवर "निमा'ने वनौषधी उद्यान विकसित केले आहे. 

चिंचवडच्या काकडे पार्कमध्ये कोरोना आला रे आला; काय आहे वास्तव वाचा सविस्तर

संघटनेचे शहर सचिव डॉ.अभय तांबिले म्हणाले, 'पूर्वी तेथील जागेवर एमआयडीसीतील कचरा टाकला जात असे. त्यामुळे, तेथे प्लास्टिक कचरा खूप आढळला. 3 ते 4 वर्षे जागेवरील कचरा हटविणे, जमिनीचे सपाटीकरण करणे आदी कामे करावी लागली. त्यानंतर, हे वनौषधी उद्यान फुलले आहे. या उद्यानात सुमारे सव्वाचारशे वनौषधी, फळे आणि फुलांच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये, 3 ते 4 फुटांपासून 20 फूटांपर्यंतचे वृक्ष असून सुमारे 70 मोठे वृक्ष आहेत.

भूक वाढीसाठी उपयुक्त भोकर, भरपूर ऑक्‍सिजन देणारे लक्ष्मी तरु यांच्यासह अश्‍वगंधा, शतावरी, आवळा, अडुळसा, हिरडा, बेहडा, तुळस, आघाडा, सप्तपर्णी, पुत्रजीवक, गुळवेल, निर्गुंडी आदी औषधी वनस्पती उद्यानात आहेत. तर 10 ते 15 प्रकारची जांभूळ, आंबा, करवंदे, केळी आदी आणि गुलाब, मोगरा, जास्वंद आदी, 10 ते 15 प्रकारची फळझाडेही लावण्यात आली आहेत. उद्यानाच्या देखभालीसाठी "निमा'चे सदस्य डॉक्‍टर नेहमी श्रमदान करत असतात.''

पिंपरीतील आनंदनगर झोपडपट्टीसाठी माणुसकी आली धावून, बघा किती छान काम करताहेत  

उद्यानातील झाडांना कधीही पाणी कमी पडू नये यासाठी दोन बोअरवेल घेण्यात आल्या आहेत. त्याद्वारे, वनौषधी जगविल्या जात आहेत. उद्यानातील प्रत्येक झाडांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. 

'भोसरी एमआयडीसीतही ऑक्‍सिजन पार्क असावे यासाठी हे वनौषधी उद्यान विकसित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळातही "निमा'चे पदाधिकारी आणि सदस्य वनस्पतींच्या देखभालीकडे लक्ष देत आहेत. शालेय विद्यार्थी, आयुर्वेदिक तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तींना वनस्पतींचा अभ्यास करता यावा हा देखील त्यामागील हेतू आहे. उद्यानात आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग सुरु करता येईल काय ? याचा विचार केला जात आहे.''
- डॉ.सत्यजीत पाटील, अध्यक्ष, निमा, पिंपरी-चिंचवड शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Herbal garden maintenance even in lockdown