Hinjawadi Merger : हिंजवडीच्या समावेशाला बळ, आयटीयन्ससह सरकार सकारात्मक; स्थानिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
PCMC Inclusion : हिंजवडी व आयटी पार्क परिसराच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेशासाठी स्थानिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत फक्त तीन दिवसांत २१ हजार स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा मिळवला आहे.
हिंजवडी : आयटी पार्कची गावे महापालिकेत समाविष्ट होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिकांकडून बळ मिळत आहे. मात्र काही जणांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.