hinjewadi traffic sakal impact
sakal
हिंजवडी - ‘हिंजवडीत दोन तास वाहतूक ठप्प’ या शीर्षकाखाली गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तत्काळ दखल घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. विनोदे चौकात आणि रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’चे फलक लावण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात विशेष कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.