
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. पीएमआरडीएने मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यांचे काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या असून इतर भागांतील रस्तेही दुरुस्त केले जात आहेत.