Hinjawadi Traffic : रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी हिंजवडीत संपादन होणार; कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा निर्णय
PMRDA : हिंजवडीसह सहा प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पीएमआरडीएने भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पिंपरी : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या भागातील प्रमुख सहा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल.