
- बेलाजी पात्रे
हिंजवडी - आयटीच्या नेरे-दत्तवाडीतील तुकाई विद्यालयासमोर रविवारी (ता. ५) सकाळी सात वाजता आमदार केसरी भव्य बैलगाडा छकडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपसरपंच व युवा नेते योगेश शिंदे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेत आकर्षक लाखो रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार आहे. मुळशी, मावळसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी नेरेत दाखल होतं आहेत.