suraj prasad death in accident
sakal
हिंजवडी - प्रसाद कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील. काही वर्षांपूर्वी ते हिंजवडीत व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. पंचरत्न चौकातील वाघिरे चाळीत भाडेतत्त्वावर राहात आहेत. चार मुलींनंतर सूरजचा जन्म झाला होता. तो सर्वांचा लाडका होता.
तो नुकताच हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊ लागला होता. देवेंद्र प्रसाद यांचा ‘रिया लॉन्ड्री अँड ड्रायक्लीनर्स’ हा व्यवसाय आहे. अतिशय कष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सोमवारी अपघातात पोटच्या गोळ्यांचा मृत्यू झाला अन् एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.