
पिंपरी : हिंजवडीतील प्रश्नांसंदर्भात बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये हिंजवडी आयटी पार्क टप्पा एक, दोन व तीनचा समावेश करणारा सविस्तर हायड्रॉलिक अभ्यास आणि वादळी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचा समावेश होता.