हिंजवडी मेट्रो स्टेशन पाईल कॅप पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

metro station pipe cap

पुणे मेट्रो लाईन तीनच्या स्टेशन नंबर आठ, म्हणजेच हिंजवडी फेज दोन येथे स्टेशन पाईल कॅपचे काम पूर्ण झाले आहे.

हिंजवडी मेट्रो स्टेशन पाईल कॅप पूर्ण

पिंपरी - पुणे (Pune) मेट्रो लाईन (Metro Line) तीनच्या स्टेशन नंबर आठ, म्हणजेच हिंजवडी (Hinjewadi) फेज दोन येथे स्टेशन पाईल कॅपचे (Pipe Cap) काम पूर्ण झाले आहे. हे स्टेशन हिंजवडी येथे असून स्टेशनच्या दुसऱ्या पाईल कॅपचे काम पूर्णत्वास आले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील मेट्रोच्या कामाने वेग घेतलेला असून, येत्या महिन्यामध्ये या स्टेशनचे पिअर (खांब) उभे केले जाण्याची चिन्हे आहेत.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तर्फे उभारण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो लाईन तीनसाठीची पहिली स्टेशन पिअर कॅप नुकतीच पूर्ण करण्यात आली. स्टेशनच्या दुसऱ्या पाईल कॅपचे कामही पूर्ण झाले आहे. या कामासाठी ३० कामगार आहेत. स्टेशन पाईल कॅपची पूर्वतयारी म्हणून पाईलिंगचे सुरु असलेले काम मार्गिकेवर पहावयास मिळत आहे. या स्टेशन पिअर कॅपसाठी सहा पाईल तयार केल्या जात आहेत.

साधारण १४ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. या कामासाठी लागणाऱ्या एकूण वेळामध्ये, प्रत्यक्ष बांधकामासाठीचे १४ दिवस आणि त्यानंतर २१ दिवसांचा प्रतिक्षाकाळ आहे. साधारण एक महिन्यामध्ये या पाईल कॅपवर पिअर उभा केला जावू शकतो. दरम्यान लोड टेस्ट, क्वालिटी चेक सारख्या महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता केली जाते.

स्टेशन पाईल कॅप म्हणजे...

स्टेशन ज्या पिअर (खांब) वर उभे केले जाणार आहे, त्या पिअर आणि त्याच्यासाठी खणलेल्या पाईलिंगला जोडणारा पाया म्हणजे पाईल कॅप आहे. ही पाईलकॅप टाकण्यापूर्वी जमिनीमध्ये खांबावर एकूण किती प्रेशर असणार आहे, त्यानुसार एक सारख्या आकाराचे खड्डे केले जातात, ज्यांना पाईल म्हटले जाते. अशा सहा पाईलिंगवर ही स्टेशन पाईल कॅप उभारण्यात आली आहे.

Web Title: Hinjewadi Metro Station Pipe Cap Complete

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HinjewadiMetro Station
go to top