Heavy Vehicles: बेलगाम जड वाहने अन् प्रशासकीय नाकर्तेपणाचे बळी! हिंजवडीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू
Hinjewadi heavy vehicle accidents claim four lives: हिंजवडी, माण, मारुंजी, ताथवडे, पुनावळे परिसरात खराब रस्ते, अवजड वाहनांची बेदरकारी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या दहा महिन्यांत चार नागरिकांचा मृत्यू झाला.
पिंपरी : खराब रस्ते, वाहतूक नियमनाचा अभाव आणि बेदरकार धावणारी अवजड वाहने या चक्रव्यूहात राजीव गांधी आयटी पार्कचा परिसर अडकला आहे. केवळ हिंजवडीच नाही; तर माण, मारुंजी, ताथवडे, पुनावळे या भागातही अशीच विदारक परिस्थिती आहे.