
हिंजवडी : आयटीनगरीतील हिंजवडी - माण रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय सध्या गाजत आहे. प्रस्तावित रस्त्यासाठी भूसंपादनाबाबत वाढीव रेखांकन (मार्किंग) करण्यात येत असून अनधिकृत बांधकामांची ढाल करून मनमानी आणि जुलमी कारवाई सुरू असल्याचा आरोप होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व पीएमआरडीए प्रशासनास सह्यांचे निवेदन दिले आहे.