
जुनी सांगवी : हलगीचा कडकडाट,सनई ताशाची जुगलबंदी आणि कुस्ती शौकीन प्रेक्षकांच्या वाह रे पठ्ठया.. शाब्बास ... म्हणत पैलवानांना दिलेल्या उत्साहाने सांगवीचा निकाली कुस्त्यांचा आखाडा टाळ्या आणि शिट्यांनी रंगला. पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कुस्ती सामना घेण्यात आला.जुनी सांगलीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सवानिमित्त सांगवीत तब्बल २५ वर्षानंतर कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.