esakal | हिंजवडीतील हॉटेल, हुक्काबार, रेस्टॉरंट सील
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीतील 18 हॉटेल, हुक्काबार, रेस्टॉरंट सील

हिंजवडीतील 18 हॉटेल, हुक्काबार, रेस्टॉरंट सील

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 18 हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार, बिअर शॉपीला पोलिसांकडून सील ठोकण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले असून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी सात ते अकरा यावेळेत परवानगी आहे. हॉटेल ऑनलाईन घरपोच सेवा पुरवू शकतात. जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही, या हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन करीत हॉटेल सुरु ठेऊन गर्दी जमवली.

दरम्यान, मंगळवारी (ता. २५) सकाळी केलेल्या या कारवाईसाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. या पथकांनी हिंजवडी-माण, पुणे बेंलोर हायवे, बावधन परिसरातील हॉटले, बिअर शॉपी, रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारला. हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी सूचना देऊन देखील हॉटेल, हुक्काबार सुरु असल्याने मुळशी तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. तहसिलदारांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या हॉटेल, रेस्टोरंन्टवर गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा: पुण्यात अखेर रुग्णवाहिकांचे दर झाले निश्चित; काय आहेत दर वाचा

हिंजवडीमधील कारवाई झालेले 18 हॉटेल, रेस्टोरंट, हुक्काबार

 1. मोफोसा हॉटेल, ऑक्सफर्ड रोड, बावधन,

 2. हॉटेल रुडलाऊंज, हिंजवडी,

 3. हॉटेल ठेका रेस्टो लॉज, भुमकर चौक, हिंजवडी

 4. हॉटेल अशोका बार अँड रेस्टो, शिवाजी चौक, हिंजवडी,

 5. हॉटेल बॉटमअप, भटेवार नगर, हिंजवडी,

 6. श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट, माण,

 7. महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज बुचडेवस्ती, मारुंजी,

 8. हॉटेल पुणेरी, बावधन,

 9. हॉटेल आस्वाद, इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी,

 10. हॉटेल शिवराज, पुनावळे,

 11. कविता चायनिज सेंटर, शिवार वस्ती, मारुंजी,

 12. हॉटेल ग्रिनपार्क स्टॉट ऑन, भुंडे वस्ती, बावधन,

 13. फॉर्च्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल, हिंजवडी,

 14. हॉटेल टिमो, चांदणी चौक, बावधन,

 15. एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट, हिंजवडी ते कासारसाई रोड, कासारसाई,

 16. वॉटर-9 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच, बावधन खुर्द, पौड रोड,

 17. योगी हॉटेल, पुणे बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे,

 18. यश करण बिअर शॉपी, हिंजवडी.

हेही वाचा: पुणे पोलिसांची साथ देणारा ३ पायांचा श्वान पाहिलात? जॉन अब्राहमनेही दिली दाद