घरकाम करणाऱ्या महिलेने पावणे पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील पावणे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना बावधन येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी : घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील पावणे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना बावधन येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मृती वासुदेव अधिकारी (वय 40, रा. विठ्ठल मंदिराशेजारी, बावधन) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुभाषचंद्र कपुरचंद्र गुप्ता (रा. अतिथ्यग्रीन बंगला, रामनगर कॉलनी, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिला ही फिर्यादीच्या घरी काम करीत असताना बंगल्यातील पहिल्या मजल्यावरील बेडरूमला लागून असलेल्या ड्रेसिंगटेबलमधील ड्रॉवरमधून कपाटरूमची चावी घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कपाटरूम उघडून लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले चार लाख 86 हजार 90 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आरोपीने लंपास केले. हा प्रकार 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत घडला. गुरूवारी (ता.17) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The housewife stole the jewelry

Tags
टॉपिकस
Topic Tags: