esakal | ‘देहूरोड कँटोन्मेंट हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल लवकर करा’
sakal

बोलून बातमी शोधा

dehu road

‘देहूरोड कँटोन्मेंट हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल लवकर करा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहूरोड: पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देहूरोड येथे मंगळवारी (ता. २) केले.

देहूरोड येथे नवीन उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. तत्कालीन भाजप शिवसेना युतीच्या काळात बाळा भेगडे यांनी विशेष प्रयत्न करून पुलाच्या बांधकामासाठी प्रयत्न केले होते. देहूरोड ते निगडी या दरम्यान झालेल्या रस्ते चौपदीकरणाचे उद्धाटनही करण्यात आले होते. मात्र, गेले तीन वर्षापासून नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू होते. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

देहूरोड भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, रघुवीर शेलार, अॅड. कैलास पानसरे, राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, सारिका नाईकनवरे, अमोल नाईकनवरे, संजय पिंजण, आदी उपस्थित होते.

loading image
go to top