पिंपरी : दंडाच्या रकमेत झाला बदल; मास्क नसल्यास आता...

पिंपरी : दंडाच्या रकमेत झाला बदल; मास्क नसल्यास आता...
Updated on

पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणा-या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका 500 रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समिती सभेने दंडाची रक्कम 500 ऐवजी 200 रुपये आकारावी, असा ठराव मंजूर केला. त्यामुळे आता मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अकरा मार्च रोजी शहरातील पहिला रुग्ण आढळला होता. सध्या रुग्ण संख्या सहाशेपर्यंत पोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे असून आयुक्तांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या रकमेत आता स्थायी समितीने बदल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक जण मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोना रोखण्याकरिता मास्क आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी सक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, ते नसल्यास 500 रुपयांऐवजी 200 रुपये दंडाची आकारणी करावी, अशी उपसूचना स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आतापर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या सुमारे तीनशे जणांवर कारवाई केली आहे. प्रत्येकाकडून 500 रुपये दंड वसूल केला आहे. असे दीड लाख रुपये दंडातून वसूल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com