
तळेगाव दाभाडे : पवना धरण परिसरात तसेच नदीपात्रालगत गेल्या काही वर्षांपासून शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून फार्महाउस, बंगले बांधण्यात आले आहेत. पवना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी ४८ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी कडधे हद्दीतील नदीपात्रालगतच्या जागेवर केलेले बेकायदा बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.