पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत शाळा अद्यापही सुरूच

अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृत शाळा बिनदिक्कतपणे सुरूच आहेत.
School
SchoolSakal

पिंपरी - अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या (Administrative) नाकावर टिच्चून शहरात महापालिकेची मान्यता (Municipal Permission) न घेता अनधिकृत शाळा (Illegal School) बिनदिक्कतपणे सुरूच आहेत. यावर्षी लॉकडाउनमध्येही (Lockdown) सहा शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले. तातडीने त्या बंद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, दरवर्षी शाळांना केवळ नोटीस बजावण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. (Illegal School Start in pimpri chinchwad)

आरटीई अधिनियमानुसार कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी मान्यता लागते. तरीही शहरातील काही शिक्षण संस्थांकडून कोणतीही मान्यता न घेता प्रवेश दिले जातात. यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचा शोध घेवून त्यांची नावे जाहीर केली जाते. तसेच या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन केले जाते. तसेच नोटीस बजावल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये २२० नवीन रुग्ण; तर २३५ जणांना डिस्चार्ज

गेल्यावर्षी यादीच नाही

२०१९-२० या शैक्षणिक वर्षात १७ शाळा अनधिकृत असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. परंतु, ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे अनधिकृत शाळांची यादी तयार केली नाही. यंदा अशा शाळांच्या संख्येत घट झाली असून केवळ सहा शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. पाच शाळा इंग्रजी माध्यमाच्या, तर एक मराठी माध्यमाची आहे.

अनधिकृत शाळा-माध्यम

  • ग्रॅंट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, कुदळवाडी - इंग्रजी

  • मास्टर केअर इंग्लिश स्कूल, भोसरी- इंग्रजी

  • ज्ञानराज प्राथमिक शाळा , कासारवाडी - मराठी

  • ज्ञानसागर इंग्लिश स्कूल (प्राथमिक) चिखली - इंग्रजी

  • मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी - इंग्रजी

  • एम.एस.स्कूल फॉर किड्स, सांगवी - इंग्रजी

महापालिकेच्या पर्यवेक्षकांना अपयश

सरकारी नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाईचे आदेश आहेत. यानंतरही संस्थाचालक शाळा सुरूच ठेवतात. परवानगी नसलेल्या शाळांवर एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. अशा शाळा सुरू राहिल्यास त्यांना प्रत्येकदिवशी १० हजार दंड ठोठावण्यात येईल. पण, अद्याप एकाही शाळेवर दंडात्मक कारवाई झालेली नाही. दंड वसूल करण्यात महापालिकेच्या पर्यवेक्षकांना अपयश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com