पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना वीजबिलांचा शॉक; करोडो रुपयांची बिले थकीत  

सुवर्णा नवले
Friday, 20 November 2020

 • लघु उद्योजक त्रस्त

पिंपरी : औद्योगिकनगरीतील कंपन्या कोरोनामुळे 21 मार्चपासून बंद होत्या. जूनमध्ये काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, पाच महिने उलटूनही उद्योगांचे अर्थचक्र रुळावर आलेले नाही. अपुरा कामगार वर्ग, कच्चा मालाचा कमी पुरवठा, वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. त्यात आता नवीन दरानुसार विजबिले आकारणी होत असल्याने अडचणीत भर पडली आहे. तसेच, लॉकडाउन काळातील बिलांमध्ये दुरुस्ती होईल किंवा बिले माफ होतील या आशेने अनेकांनी बिले भरलेली नाहीत. आता सरकारने वीजबिले माफ न करण्याचा निर्णय घेतल्याने थकीत व वाढीव वीजबिलांचा शॉक उद्योजकांना बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू झाले आहेत. लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प असूनही जादा बिले आलीच कशी, या संभ्रमातच कंपनी मालक आहेत. तळेगाव, चाकण, भोसरी एमआयडीसीत 14 हजारांवर लघुउद्योग आणि चारशेपेक्षा अधिक मोठे उद्योग आहेत. या सर्वांसमोर वीजबिलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण, नवीन दरानुसार वीजशुल्क दीडपट झाले आहे. जूनपर्यंत रिडींग न घेताच बिले पाठवली आहेत. सध्या चाळीस टक्के कंपन्यांची वीजबिल भरण्या इतकीही परिस्थिती नाही, लघुउद्योजकांनी सांगितले. थकीत बिलांची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. दरम्यान, प्रत्येक कपंन्यांच्या एलटी (लो टेंशन) व एचटी (हाय टेंशन) नुसार सरासरी बिले आकारण्यात आल्याचे महावितरणच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंधरा ते वीस हजार वीजबिल यायचे. कोरोना कालावधीत व कंपनी सुरू झाल्यानंतरही तीस ते पस्तीस हजार रुपये वीजबिल आले आहे. मात्र, उत्पादन घटले आहे. विजेचा वापर जेमतेम आहे. टप्प्याटप्याने वीजबिल दरात बदल होणे अपेक्षित होते किंवा सवलत द्यायला हवी होती. अद्याप लघू उद्योजक मोठ्या अडचणीत आहेत. मोठा आर्थिक फटका बसत असून विज आकारणीवर फेरविचार होणे गरजेचे आहे. 
- जयदेव अक्कलकोट्टे, फेज थ्री, लघुउद्योजक संघटना, चाकण एमआयडीसी 

वीजदरामधील बदल 

 • आकारणी/पूर्वी/आता (प्रती युनिट) 
 • वहन आकार/1.28/1.45 
 • 100 युनिटपर्यंत/3.95/3.46 
 • 300 युनिटपर्यंत/6.95/7.43 
 • 500 युनिटपर्यंत/9.90/10.32 
 • सरासरी देयक दर/6.85/7.31 

पुणे जिल्ह्यातील थकबाकीदार 
(एप्रिल ते सप्टेंबर) 

 • थकबाकीदार : 5 लाख 72 हजार 
 • थकबाकी : 644 कोटी 37 लाख 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increased electricity bills for entrepreneurs in pimpri chinchwad