Cyber Slave
sakal
पिंपरी - सोशल मीडियावर अालेल्या जादा पगाराच्या नोकरीच्या जाहिरातीला बळी पडून कंबोडियात एक तरुण नोकरीसाठी गेला. तेथे त्याला ‘सायबर स्लेव्ह’ बनविले गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. बेकायदा काम करण्यास नकार दिल्याने अमानुष अत्याचार करून त्याला चार महिने एका खोलीत डांबून ठेवले गेले. काहीही झाले तरी हे काम करणार नाही, यावर ठाम राहिल्याने त्याला सोडून देण्यात आले.