Missing Child Rescue in Hours : आईचा आक्रोश...पोलिसांची शर्थ... आणि अवघ्या तीन तासांत सापडला मुलगा
Police Find Missing Child Fast : तळेगाव हॉस्पिटल परिसरातून हरवलेला आठ वर्षीय भरत घोसले या मुलाला इंदोरी पोलिस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासांत शोधून आईच्या कुशीत सोपविले.
इंदोरी : तळेगाव जनरल हॉस्पिटल हद्दीतून हरवलेल्या आठ वर्षीय मुलाला पोलिसांनी अवघ्या तीन तासांत शोधून त्याच्या आईकडे सोपविले. भरत भगवान घोसले असे या बालकाचे नाव आहे. ही कामगिरी इंदोरी पोलिस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केली.