Udam Samant : पिंपरी-चिंचवड शहरात उद्योजिका आणि उद्योजक मेळावा

पिंपरी-चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना आणि फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने उद्योजिका आणि उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Uday Samant
Uday SamantSakal
Updated on
Summary

पिंपरी-चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना आणि फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने उद्योजिका आणि उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पिंपरी - पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना आणि फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने उद्योजिका आणि उद्योजक मेळावा शुक्रवारी (ता. १०) दुपारी ४ वाजता भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक-भूखंड क्रमांक ९७, भोर इंडस्ट्रियल कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, महावितरण व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिलांना विशेष करून महिला उद्योग निर्मितीसाठी चालना देण्यासाठी विविध विषयावर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढील काळात महिला लघुउद्योजक संघटनेसाठी शहरात महिला उद्योगांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणारआहे, असे दुर्गा भोर यांनी सांगितले.

महिला उद्योजिकांच्या समस्या सोडविण्याचे साकडे

दुर्गा भोर यांनी उद्योगमंत्री सामंत यांना शहरातील महिला उद्योजकांच्या प्रश्‍नांसंदर्भात नुकतेच दुर्गा भोर यांनी भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी महिला उद्योजकांसाठी जागा तसेच महिला उद्योगांना उद्योग व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. परंतु; शहरांमध्ये महिलांच्या उद्योगासाठी कोणतीही पायाभूत सुविधा अद्याप उभारण्यात आलेल्या नाहीत. शहरामध्ये महिला उद्योजक घडविण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. परंतु; महिलांना शहरातील औद्योगिक परिसरामध्ये उद्योग करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महिलांना निर्यात क्षेत्रापासून आपण बनवलेल्या वस्तूंना देखील बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे महिला उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी धजावत नाहीत. सरकारने महिलांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी शासनाच्या योजना देऊन व स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारावे, निर्यात करण्यासाठी योजना द्याव्यात आणि सहकार्य करावे, असे साकडे त्यांना घालण्यात आले होते. त्यावेळी सामंत यांनी लवकरात लवकर यावर विचार करून पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन दिले होते, अशी माहिती दुर्गा भोर यांनी दिली.

महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, निर्यात आणि येणाऱ्या आधुनिक काळातील उद्योगांविषयी देखील माहिती देण्यात येईल. शहरातील महिलांनी आणि उद्योजकांनी मेळाव्यास उपस्थित राहून उद्योग क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी शासनाचे नवीन योजना व त्या संदर्भात देखील माहिती दिली जाईल.

- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ र्स्माल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.