पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्ये कंपन्यांचं कामकाज सुरळीत, मात्र...

पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्ये कंपन्यांचं कामकाज सुरळीत, मात्र...
Updated on

पिंपरी : पाच दिवसांच्या लॉकडाउनमध्ये उद्योगांना परवानगी मिळाली आहे. कंपन्यांचे कामकाज सद्य:स्थितीत सुरळीत सुरू आहे. मात्र, उद्योगासाठी अत्यावश्‍यक हार्डवेअर व कच्चा मालाची दुकाने बंद असल्याने ती सुरू करण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे. किमान भोसरी, चिंचवड एमआयडीसी परिसरातील दुकाने सुरू करावीत, अशी मागणी लघु उद्योजकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात तीन हजारांच्यावर सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग आहेत. तीन महिन्यानंतर कंपन्यांचे काम काही अंशी पूर्वपदावर आले. मात्र भोसरी, चिंचवड येथील कंपन्यांना पाच दिवसांच्या कडक लॉकडाउन कालावधीत विविध टुल्सची गरज भासणार आहे. कंपन्यांमध्ये काम सुरू असताना अशा साहित्याचा वेळोवेळी गरज लागते. त्यामुळे तळवडे, भोसरी, कुदळवाडी या भागातील हार्डवेअरच्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने बंद असल्याने कामाचा खोळंबा होणार आहे. कंपन्यांमधील मशिनचे काम सुरू असताना वेल्डिंग रॉड, व्हिलसह विविध टुल्स गरजेचे असल्याचे कंपन्यांनी सांगितले.

भोसरी व चिंचवड परिसरातील सर्व कामगारांना कंपन्यांनी पास दिले आहेत. पोलिस पास व ओळखपत्र तपासत आहेत. काही कर्मचारी घरून काम करत आहेत. काही कंपन्यांनी कामगारांची राहण्याची व खाण्याची सोय कंपन्यांमध्येच केली आहे. तर काही जणांनी गर्दी होणाऱ्या ठिकाणचे काम तात्पुरते बंद ठेवले आहे. मात्र, घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या पगारावरच समाधान मानावे लागत आहे.

कंपनीतून विनाकारण कोणीही बाहेर पडायचं नाही. तशा सूचना सर्व कामगारांना दिलेल्या आहेत. कामगारांच्या पासची एक प्रत पोलिसांना दिलेली आहे. काही पेट्रोल पंपचालक कामगारांच्या पासवर पोलिस व महापालिकेचा शिक्‍क्‍याची मागणी करीत आहेत. त्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय गरजेचा आहे, असे लघू उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.

कंपन्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची पुरवठा करणारी दुकाने बंद आहेत. काम सुरू असताना या साहित्याशिवाय अडथळा निर्माण होऊ शकतो. महापालिका व पोलिसांच्या सहकार्यामुळे कंपनीच्या कामात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही.
- प्रदीप गायकवाड, शामदीन इंडस्ट्री, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com