- अश्विनी पवारपिंपरी - कोणत्याही कुटुंबातील वातावरण उत्तम असण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या काळात सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे परस्परांमधील संवाद हरवत चालला आहे..परिणामी बहुतांश कुटुंबांमध्ये भावनिक दुरावा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाइन चॅटिंगद्वारे संवाद साधतात. मात्र हा संवाद प्रत्यक्ष नसल्याने अनेकदा गैरसमज निर्माण होतात.संवादातील अडथळा - घरात असतानाही मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे सर्वांचेच लक्ष विचलित होते. कुटुंबातील सदस्यांमधील संवाद यामुळे पूर्ण होत नाही. परिणामी एकतर्फी संवाद होतो अथवा तो केलाच जात नाही. याचा नात्यावर परिणाम होतो..वेळेचा अभाव - लहान झालेली कुटुंब, स्पर्धेच्या युगात आपले काम अभ्यास यामध्ये बिझी असणारे पालक व पाल्य यामुळे कुटुंबीयांना एकत्र असा वेळ मिळत नाही. अशातच प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे जग जवळ आले आहे. मात्र, याच इंटरनेट व सोशल मिडियामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दुरावले आहेत. अनेकजण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात, त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.भावनिक दुरावा - सतत ऑनलाइन जगात रमल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होत आहे. एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यात कमी पडतात. व्हर्च्युअल जगाशी तुलना आपल्या कुटुंबीयांशी किंवा जोडीदाराशी केली जाते. त्यातून नात्यात दुरावा येत आहे..काय करणे आवश्यकस्मार्ट फोनशिवाय वेळ घालवणे आवश्यकमुलांना फोन वापरायला देताना काय पहावे, याचीही सवय लावणे गरजेचेएकत्र जेवण करणे, विविध कामे एकत्र करणेसोशल मीडिया कसे वापरावे कोणत्या माहितीचा कसा वापर करावा, याची माहिती मुलांना द्यावीकुटुंबीयांनी एकत्र सण साजरे करावे.सोशल मिडीयाला खरे जग समजून अनेकदा त्याची तुलना आपल्या आयुष्याशी केली जाते. यावर येणारे रिल्स पाहून त्याच्याशी आपला जोडीदार किंवा कुटुंबीयांची तुलना केली जाते. हे नात्यांसाठी घातक आहे. फोन कसा वापरावा, कुठल्या माहितीवर विश्वास ठेवावा, याचेही ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे.- डॉ. जयदीप पाटील, समुपदेशक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.