पिंपरी - हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा बाणेरपर्यंतचा टप्पा दिवाळीपर्यंत सुरू करावा अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केलेली आहे. हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या फोरम फॉर आयटी एम्प्लाईज या संघटनेने पत्राव्दारे पीएमआरडीएकडे ही मागणी केली आहे.