
पिंपरी : जेईई (मेन्स) परीक्षेला आजपासून सुरवात झाली आहे. ही परीक्षा देण्यासाठी घरातून वेळेत बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी शहरातील वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केल्याने बहुतांश कॉलेज, ज्युनिअर कॉलेज परिसरात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. शहरातील प्रमुख रस्ते व चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी वाहतूक कोंडीची परीक्षा देऊन मगच ‘सेशन एक’ 'पेपर' हाती घेतला.