Wakad News : काळाखडक एसआरएच्या विरोधात रहिवाशांची निदर्शने

झोपडपट्टीत एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी रहिवाशांच्या चुकीच्या पध्दतीने सहमती घेण्याचे काम करत आहेत.
Protests
Protestssakal

वाकड - येथील काळाखडक झोपडपट्टीतील रहिवाशांना विश्वासात न घेता विकसक एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबवित असल्याचा आरोप करत रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली काळाखडक चौकात सोमवारी (ता. २९) सकाळी निदर्शन आंदोलन केले.

झोपडपट्टीत एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी रहिवाशांच्या चुकीच्या पध्दतीने सहमती घेण्याचे काम करत आहेत. काही दलाल व गुंडांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने व दडपशाहीने काहीजण येथे रहिवाशांना अर्ज भरण्यास भाग पाडले जात आहे असा आरोप करत रहिवाशांनी घोषणाबाजी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एसआरए विभागाने तात्काळ दखल घेऊन या बेकायदेशीर बिल्डरांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा काळाखडक संघर्ष समितीच्या वतीने लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयावर व महापालिका भावनावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा अनिल जाधव यांनी दिला. यावेळी काळाखडक परिसरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, रहिवाशी उपस्थित होते.

प्रतिक्रिया -

झोपडपट्टीत दलित, आदिवासी व वडारी समाजाची गरीब गरजू लोक वर्षानुवर्षे राहत आहे. त्यांनी खूप कबाडकष्ट करुन मेहनतीने आपला निवारा उभा केला आहे. त्यामुळे या उपेक्षित समाजाला विश्वासात न घेता गुंडाच्या व दडपशाहीच्या जोरावर एसआरए अथवा कोणतीही योजना राबवू नये अन्यथा अन्यायाविरोधात मोठा संघर्ष उभा केला जाईल.

- अनिल जाधव, प्रदेशउपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

दिशाभूल करून बेकायदा काम करणाऱ्या अन्य बिल्डरांच्या विरोधात ती निदर्शने होती. आम्ही जागामालक असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. याची माहिती एसआरए कार्यालयात सर्वांसाठी उपलब्ध आहे. सर्वांना पक्के, प्रशस्त घरे देऊन काळाखडकचा कायापालट करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. शहरातील या पायलट प्रकल्पाचे सर्व प्रेझेंटेशन लवकरच रहिवाशांना देणार आहेत. काही लोक राजकीय व आर्थिक स्वार्थापोटी गैरसमज पसरवत आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

- केतुल सोनिगरा, विकसक मे.जय इंटरप्रयाझेस

मे.जय इंटरप्रयाझेस हे जमीन मालक असून काळाखडकचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा एकमेव प्रस्ताव आमच्याकडे दाखल झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य एक-दोन विकसक प्रयत्न करत असल्याचे आमच्या कानावर आहे. मात्र, नियमानुसार जागामालकाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मे. जय इंटरप्रायझेस यांना प्रथम संधीने त्यांचा प्रस्ताव मान्य केलेला आहे

- निलेश गटणे, सीईओ (आयुक्त) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com