

Exploitation at Maha E-Seva Centers
Sakal
संदीप सोनार
काळेवाडी : काळेवाडी, रहाटणी परिसरात शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनेक महा ई-सेवा चालकांकडून मनमानी पद्धतीने शुल्कापोटी अवाचेसव्वा पैसे घेतले जातात. सेवेच्या नावाखाली केंद्र चालक मेवा खात आहेत. या उलट जादा पैसे मोजूनही नागरिकांना दाखल्यासाठी शासकीय नियमांनुसारच १५ ते ४५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.