esakal | कामशेत बाजारपेठेला पार्किंगचे ग्रहण!

बोलून बातमी शोधा

कामशेत - बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेली वाहने.}

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वसलेली खडकाळ्याची बाजारपेठ ही कामशेत शहर या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सध्या या बाजारपेठेत महिला मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी येत आहेत.

कामशेत बाजारपेठेला पार्किंगचे ग्रहण!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कामशेत - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वसलेली खडकाळ्याची बाजारपेठ ही कामशेत शहर या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सध्या या बाजारपेठेत महिला मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी येत आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पार्किंगची सोय नसल्याने बाजारपेठेला पार्किंगचे ग्रहण लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, गणपती व साईबाबा या चौकांमध्ये सर्वाधिक पार्किंगची सोय आहे. सुवासिक तांदळाची हक्काची बाजारपेठ अशी ओळख आहे. या बाजारपेठेत लग्न सराईत बस्ता बांधायला खेड्यापाड्यातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून ग्राहकांना बाजारपेठेत खरेदीसाठी जावे लागते. हजारोंच्या संख्येने ग्राहक येतात. त्यामुळे कुठे आणि कसेही वाहन लावून जातात. बारा महिने गजबजलेल्या या बाजारपेठत पार्किंगची समस्या बनली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना साइडपट्ट्या भरणे आवश्यक होते. त्यामुळे नागरिकांना बाजारपेठेत आल्यावर वाहने लावणे सोयीचे झाले असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण केल्याने साइडपट्ट्यांपेक्षा रस्त्याची उंची वाढली आहे. जिथे जागा मिळेल, तिथे नागरिक वाहने लावतात.
- रोहिदास वाळुंज, माजी अध्यक्ष, मावळ तालुका युवक काँग्रेस

मी खरेदीसाठी बाजारपेठेत नेहमी येतो. पार्किंगची कुठलीही सोय नसल्याने वाहन रस्त्याच्याकडेलाच उभे करावे लागते. 
- सोमनाथ शिंदे, ग्रामस्थ, उकसाण

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारपेठेतील दुकानांपुढे वाहनचालक गाडी लावून निघून जातात. एकदा गाडी लावून गेल्यावर परत कधी येतील? हे माहीत नसते. त्यामुळे कित्येक दुकानात ग्राहकच येत नाहीत.
- सुभाष छाजेड, व्यापारी 

Edited By - Prashant Patil