

Pune District
esakal
लोणावळा: ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य परिसर लाभलेल्या कार्ला गावाच्या वैभवात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येथील ऐतिहासिक तळ्याच्या पुनरुज्जीवनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, गाळ काढणे आणि खोलीकरणामुळे या तळ्याला लवकरच गतवैभव प्राप्त होणार आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या ‘लोकसहभागातून गाव विकास’ या जिद्दीतून हे स्वप्न साकार होत आहे.