
पिंपळे गुरव : नजरचुकीने स्वतःच्या खात्यात जमा झालेले ५० हजार रुपये गुरगाव येथील काश्मिरी युवकाने माणुसकी आणि प्रामाणिकपणा दाखवत पोलिसांसमक्ष संबंधित व्यक्तीला परत केले. विशेष म्हणजे हे पैसे देण्यासाठी त्याने गुरगाव ते सांगवीपर्यंतचा १४०० किलोमीटरचा प्रवास केला.