कोरोनाबाधितांनो, दावाखान्यात जाताना 'या' वस्तू सोबत ठेवा, नाहीतर...

कोरोनाबाधितांनो, दावाखान्यात जाताना 'या' वस्तू सोबत ठेवा, नाहीतर...
Updated on

पिंपरी : कोरोनाची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास अचानक खासगी व सरकारी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे. क्वारंटाइन झाल्यानंतर दवाखान्यांमध्ये कीट मिळते. परंतु, रुग्णासोबतही अत्यावश्‍यक साहित्य गरजेचे आहे. परिणामी, रुग्णांची धांदल उडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार नेमके कोणते साहित्य बरोबर असायला हवे. लहान मुलांसह, ज्येष्ठांचीही आबाळ होत आहे. काही पॉझिटिव्ह रुग्णांनी बरे झाल्यानंतर अत्यावश्‍यक वस्तूंचे कीट सोबत बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

शासकीय वायसीएम रुग्णालयासह भोसरी, जिजामाता रुग्णालय, बालेवाडी व 11 कोविड सेंटरसह साहित्याचा तुटवडा नाही. मात्र, उपलब्ध वस्तू वेळेत मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यास कधी-कधी पूर्ण कुटुंबदेखील रुग्णालयात क्वारंटाइन केले जात आहे. सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र, अशा वेळी नातेवाइकांना देखील रुग्णांशी संपर्क साधता येत नाही. कधी-कधी दवाखान्यांच्या गेटवरच रुग्णांसाठी लागणारे साहित्य पोचविण्याचा प्रकार घडत आहे. बाहेरचे जेवण व नाष्टा देखील स्वीकारला जात नाही. बऱ्याच जणांच्या दैनंदिन सवयी या रोजच्या जगण्याचा भाग झालेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना अत्यवस्थ जाणवू लागते. मानसिक संतुलन नीट राहण्यासाठी रुग्णांना साहित्य सोबत बाळगण्यासाठी परवानगी दिली जात आहे. लहान मुलांच्या दृष्टीने देखील अत्यावश्‍यक साहित्य सोबत नसल्याने मुलं सैरभैर झाल्याचे प्रकार घडत आहेत.

रुग्णांच्या कीटमध्ये काय गरजेचे?

लहान मुले, ज्येष्ठ यांच्यासाठी फळे, बिस्कीट, डायपर, मसाज तेल, गुट्टी, बेबी पावडर, औषधांचे कीट. गरम पाण्याची मशिन, चादर व ब्लॅंकेट, गोळ्या औषधे, डायपर, पुस्तके, छंद असेल ती वस्तू, खाण्यायोग्य वस्तू. हळद पावडर, मीठ, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स, मनोरंजनात्मक साहित्य, पुस्तके, अतिरिक्त कपडे, गुडनाईट कॉईल, प्लेट्स आदी

दवाखान्यांच्या कीटमध्ये काय आहे?

टॉवेल, मिनरल वॉटर पाणी बॉटल, ग्लास, कपडे धुण्यासाठी साबण, दोन अंगाचे साबण, टूथपेस्ट, टूथब्रश आहे. तर जेवणामध्ये सकाळचा नाष्टा, 2 वेळा चहा, दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण व पाणी.

शक्‍यतो रुग्णांना कोणत्याच वस्तूंची गरज भासत नाही. त्यांना वेळेवर आपण सर्व साहित्य पुरवितो. गरम पाणी व अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे असणे गरजेचे आहे.
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com