
Wakad Traffic
Sakal
अश्विनी पवार
पिंपरी : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ताथवडे आणि पुनावळे येथे अरुंद भुयारी मार्गांमुळे वाहतूक कोंडीचे होते. वाकड, भूमकर चौक येथील भुयारी मार्गही अपुरे पडत असल्याने कोंडी फोडण्यासाठी किवळे जंक्शन- नऱ्हे अशा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाठविलेल्या प्रस्तावावर वाहतूक मंत्रालयाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे तरी पुनावळे - ताथवडे - वाकड येथील कोंडी फुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.