Video : इतिहासाची साक्ष देणाऱ्या मावळातील 'या' मंदिराबद्दल जाणून घ्या

Video : इतिहासाची साक्ष देणाऱ्या मावळातील 'या' मंदिराबद्दल जाणून घ्या

पवनानगर  (ता. मावळ) : पवना धरणाच्या पाण्यात बुडालेले  तसेच, इतिहासाची साक्ष देणारे वाघेश्वर येथील शिवकालीन वाघेश्वर मंदिर यंदा श्रावण महिन्यात उघडे झाले आहे. १९६५ मध्ये पवना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १९७१ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी धरणात पाणी साठवण्यात आलं आणि हे ऐतिहासिक मंदिर पाण्यात बुडालं.

अजिवली येथील गुहेमध्ये एक ऋषी राहत होते. या ऋषींनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार एक गुरे चारणारा दररोज आपली गुरे घेऊन अजिवलीच्या या डोंगरावर येत असत. त्या गुरांमध्ये एक गाय होती, ती रोज त्या गुरांमधून गायब होत असत, हे त्या गुराख्याच्या लक्षात आले. त्याने एक दिवस त्या गायीचा पाठलाग केला, तर त्याला दिसले, की ज्या ठिकाणी आता हे मंदिर आहे. त्या जागेवर ती गाय उभी होती. तिच्या सडांमधून आपोआप दुधाच्या धारा खाली पडत होत्या. त्या दुधातून एक स्वयंभू शंकराची पिंड तयार झाली. तेथे मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर त्या मंदिराला वाघेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या नावावरूनच गावाला वाघेश्वर नाव पडल्याचे नागरिक सांगतात.

या मंदिराचे बांधकाम ६० बाय ४० फूट एवढे मोठे होते. तर त्या मंदिराचा गाभारा १५ बाय २० फूट एवढा मोठो होता. मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये होते. सद्य:स्थितीला या मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक राहिला असून, तोही ढासळू लागला आहे. त्याभोवती असणाऱ्या भिंतीच्या खुणा अजूनही अस्तित्वात आहेत. मंदिराभोवती एक नीळकमल तळेदेखील होते, असे नागरिकांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवना धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे मंदिर पाण्यात गेले. त्यानंतर १९९३-९४ मध्ये या मंदिराची पाण्याच्या बाहेर वाघेश्वर गावाजवळ प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्यावर आले, की आवर्जुन येथे दर्शनाला येत असत, असे सांगितले जाते. यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. धरणामध्ये जून महिन्यात फक्त १७ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला होता. त्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने ऑगस्ट येऊन ठेवला, तरी साठा केवळ ३५ टक्के आहे. त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात वाघेश्वराचे मंदिर उघडे झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्णत: दगडी चिर्‍यांत रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षांचे सोबती आहे. असे त्याची सद्य:स्थिती पाहून वाटते. कारण दगडी चिरांना चहू बाजूंनी क्षाराच्या थरांनी गाठले आहे. कळस उद्ध्वस्त झाला असून, मंडपच केवळ शिल्लक आहे. या मंदिराच्या वितानाच्या शिळा आज जागोजागी हाललेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत. मंदिराच्या चहू बाजूंना प्रचंड प्रमाणात अवशेषांचा ढिगारा झाला आहे. अप्रतिम अशी दीपमाळ तिथे नक्की असेल, हे आता तिथे पडलेल्या अवशेषांवरून कळते. नाल्याला छोटासा घाट व त्यानंतर वाहनमंडप त्यात अगाध कोरीवकामाचा नमुना असलेला नंदी आहे. त्यानंतर मुखमंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता आहे. पुढे सभामंडप, अंतराळ आणि त्यानंतर दोन पायर्‍या उतरून, गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल, अशा खुणा दिसून येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com